क्राईम न्यूजमुंबई
Trending

भाईंदर ; अकरा वर्षीय मुलावर अत्याचार, आरोपीला दोन दिवसात अटक

Bhayandar Rape Case : आरोपीच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

भाईंदर :- भाईंदर पूर्व येथे असलेल्या ओम श्री कृष्णलीला बिल्डिंग, इंद्रलोक फेज-2 येथे राहणाऱ्या रेणु अभिषेक त्रिपाठी यांच्या अकरा वर्षीय मुलावर त्याचा मित्र अजित सिंग याने अनैसर्गिकरित्या अत्याचार केल्याची तक्रार नवघर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी अजित सिंग यांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत 4,6,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला अवघ्या दोन दिवसातच अटक करून त्याला जेरबंद केले आहे. Bhayandar Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्टच्या दरम्यान रेणू अभिषेक त्रिपाठी यांच्या अकरा वर्षीय मुलावर त्याच्या मित्राने अजित सिंग याने एका रूम मध्ये जाऊन अनैसर्गिकरित्या अत्याचार केल्याची तक्रार नवघर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. लहान मुलाच्या संदर्भातील गुन्हा गंभीर असल्याने पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी आरोपीच्या तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल नंबर च्या आधारे आरोपी अजित सिंग याला स्वप्नलोक इंद्रलोक फेज-1 भाईंदर पूर्व येथून ताब्यात घेतले आहे. आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडेमाळी करत आहे. Bhayandar Crime News

पोलीस पथक

मधुकर पांण्डेय, पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय,दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-01,राजेंद्र मोकाशी सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांचा मार्गदर्शनाखाली धिरज कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडेमाळी पोलीस हवालदार भुषण पाटील, संतोष पाटील, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, जयप्रकाश जाधव, पोलीस अंमलदार ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत, संकेत मगर, अस्वर, पवार तसेच कुणाल हिवाळे यांनी केलेली आहे. Bhayandar Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0