
Thane Shivsena News : धुळे, पुणे, नंदुरबारसह मुंबईतील अनेक कार्यकर्त्यांचा ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
ठाणे :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, मतदान 2 डिसेंबरला आणि मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पक्षांतराला मोठा वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. Thane Latest News
उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश
हा पक्षप्रवेश सोहळा ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.
धुळे, पुणे, नंदुरबारसह विविध जिल्ह्यातील आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.
मात्र, यामध्ये शिवसेना (ठाकरे गट) च्या पदाधिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
प्रवेश केलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये खालील नावांचा समावेश आहे
डॉ. संजय लारने पाटील – (ठाकरे गट) धुळे सचिव/प्रवक्ता
जीतेंद्र जगताप – (ठाकरे गट) नगरसेवक-धुळे
हेमंत पाटील – (ठाकरे गट) माजी गटनेते शिरपूर नगर परिषद, धुळे
वसंत पावरा – (ठाकरे गट) माजी सभापती जिल्हा परिषद
राजेंद्र गिरास – माजी नगरसेवक – शिरपूर नगर परिषद
विनोद जगताप – (ठाकरे गट) शहर संघटक – धुळे
हेमहराज राजपूत – राष्ट्रवादी (शरद पवार गट) शहराध्यक्ष
राजेश फड – माजी जिल्हा परिषद सदस्य- परभणी
प्रथमेश चव्हाण – मनसे माथाडी उपाध्यक्ष
गोपीनाथ संसारे
या पदाधिकाऱ्यांसोबतच मुंबईतील विक्रोळी, चेंबूर, कांजूरमार्ग भागातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.


