मुंबईक्रीडा
Trending

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची ‘फायनल’ची वाट थोडी कठीण

पंजाबविरुद्ध सात गडींचा पराभव; टॉप दोनमधून बाहेर

IPL 2025 :- इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्लेऑफसाठी लढा अधिक चुरशीचा होत असतानाच, मुंबई इंडियन्सने सोमवारच्या सामन्यात पंजाब किंग्सकडून सात गडींचा पराभव स्वीकारत शीर्ष दोन स्थान गमावले. Mumbai Indians आता मुंबईला अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन नॉकआउट सामने जिंकावे लागणार आहेत. IPL latest Updates

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 184 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 39 चेंडूंमध्ये 6 चौकार व 2 षटकारांसह 57 धावांची झुंजार खेळी साकारली. मात्र पंजाबकडून जोश इंग्लिस (73) आणि प्रियांश आर्य (62) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 109 धावांची भागीदारी करत मुंबईच्या गोलंदाजांचा जोर कमी केला. पंजाबने 18.3 षटकांत 3 बाद 187 धावा करत सहज विजय मिळवला.

सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने पराभवाची जबाबदारी स्वीकारत म्हटलं, “विकेटच्या स्थितीनुसार आम्ही 20 धावा कमी केल्या. हे क्रिकेट आहे – असं घडतं. आम्ही चांगलं खेळतोय पण आज ते साध्य झालं नाही. आमच्याकडे पाच ट्रॉफीज आहेत, पण इथपर्यंत पोहोचणं कधीच सोपं नव्हतं.”

पुढील टप्प्यात मुंबईला 30 मे रोजी मोहाली येथे होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात खेळावं लागेल. त्यानंतर ‘क्वालिफायर 2’ मध्ये विजय मिळवूनच अंतिम फेरीची तिकिट मिळवता येणार आहे. अनुभवसंपन्न संघ म्हणून मुंबईकडून जोरदार पुनरागमन अपेक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0