मुंबई
Trending

BEST Bus Ticket Price Hike: मुंबईकरांच्या खिशाला फटका बसणार, बेस्ट बसमधून प्रवास महागला

BEST Bus Ticket Price Hike: मुंबईकरांच्या खिशाला फटका बसणार, बेस्ट बसमधून प्रवास महागला बेस्ट बसचे भाडे वाढवण्यात आले आहे, जे 9 मे 2025 पासून लागू होईल. या वाढीव भाड्याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर होईल आणि तिकिटांचे दर दुप्पट केल्याने त्यांच्या अडचणी वाढतील.

मुंबई :- मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता बेस्ट बसने प्रवास करणे महाग झाले आहे. बेस्ट बस भाडे दुप्पट करण्यात आले आहे, आजपासून जे 9 मे 2025 पासून लागू होईल. BEST Bus Ticket Price Hike या वाढीव भाड्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

आतापर्यंत भाडे स्लॅब 5,10,15 आणि 20 किमी पर्यंत मर्यादित होते. परंतु, नवीन प्रस्तावात, 5 किमी ते 50 किमी पर्यंत दर 5 किमी अंतरावर एक नवीन स्लॅब निश्चित करण्यात आला आहे. 5 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी किमान भाडे आता 5 रुपयांवरून 10 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.एसी बस चे भाडे 5 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी किमान भाडे आता 6 रुपयांवरून 12 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.पूर्वी 12 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी कोणतीही सवलत नव्हती, परंतु आता 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना भाड्यात सवलत दिली जाईल.

मुंबई आणि उपनगरांमध्ये आता बेस्ट बस अमर्यादित प्रवास पास उपलब्ध: दैनिक पास 60 वरून 75 पर्यंत वाढला, तर मासिक पास 900 वरून 1800 पर्यंत वाढला.26 वर्षांखालील खाजगी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी पास सध्याच्या सवलतीच्या दरात उपलब्ध राहतील. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच CHALO स्मार्ट कार्डद्वारे मोफत प्रवास सुविधा मिळत राहील.प्रवाशांना त्यांच्या निश्चित अंतरानुसार आठवड्याचे किंवा मासिक पास घेऊन बेस्ट बसेसमध्ये प्रवास करता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0