Mumbai Breaking News : धक्कादायक! दिवाणी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर लाचेचा गुन्हा; लिपिक 15 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Mumbai Mazagon Court Judge Bribe News : तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी’ 25 लाखांची मागणी; एसीबीची माझगाव न्यायालयात मोठी कारवाई
मुंबई :- मुंबईतील न्यायव्यवस्थेला हादरवणारी एक घटना उघडकीस आली आहे. एका प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी 25 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) माझगाव दिवाणी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी (वय 55) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या लाचेच्या रकमेतील 15 लाख स्वीकारताना न्यायालयातील लिपिक चंद्रकात वासुदेव (वय 40) याला एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. Mumbai Mazgaon Court Bribe News
तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीची जागा बळकावल्याप्रकरणी हे प्रकरण दिवाणी सत्र न्यायालयात वर्ग झाले होते. या प्रकरणात मदत करण्यासाठी लिपिक चंद्रकात वासुदेव याने तक्रारदाराची भेट घेऊन एकूण 25 लाख लाचेची मागणी केली. यातील 15 लाख अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी यांच्यासाठी मागितले होते. Mumbai Latest Crime News
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर बुधवारी न्यायालयाच्या परिसरात सापळा रचण्यात आला. लाचेच्या रकमेतील 15 लाख स्वीकारताना लिपिक चंद्रकात वासुदेव याला रंगेहाथ अटक करण्यात आली. लाच स्वीकारल्यानंतर वासुदेव यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांना कळवले आणि त्यांनीही लाच स्वीकारण्यास संमती दिली. या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी चंद्रकात वासुदेव याला 16 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे, तर अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना अद्याप अटक झालेली नाही. Mumbai Latest Bribe News


