CM Devendra Fadnavis : फडणवीसांचा मनसेला थेट इशारा – “मराठीच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही”

CM Devendra Fadnavis On MNS : मनसेची आक्रमक भूमिका, भाजप-मनसे आमने-सामने
मिरा रोड :- राज्यात सध्या मराठी आणि हिंदी भाषेच्या वादावरून वातावरण चांगलेच तापले आहे. मिरा भाईंदरमधील मिठाईच्या दुकानात मराठी बोलण्यास नकार दिल्याच्या प्रकरणावरून उफाळून आलेल्या संतापाने राजकीय रंग घेतला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी दुकानात जाऊन संबंधित व्यक्तीस मारहाण केल्याचा आरोप झाल्याने गुरुवारी व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवून निषेध मोर्चा काढला. CM Devendra Fadnavis On MNS
मनसेने या मुद्द्यावर आपली ठाम भूमिका मांडली असून, पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी-अमराठी वाद पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. भाजप आणि मनसे यांच्यात यामुळे थेट संघर्षाची चिन्हं दिसू लागली आहेत.
या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया दिली. “मराठीच्या नावाखाली कोणी गुंडगिरी केली, तर ती सहन केली जाणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
फडणवीस म्हणाले, “आम्ही सुद्धा मराठी आहोत आणि मराठीचा अभिमान बाळगतो. पण एखाद्या माणसाला मराठी येत नाही म्हणून त्याला मारहाण करणे अयोग्य आहे. उद्या आपले मराठी बांधव इतर राज्यांमध्ये व्यवसाय करताना स्थानिक भाषा येत नाही म्हणून त्यांच्यावर अशी वागणूक झाली, तर आपण काय म्हणू?”
तसेच, केंद्र सरकारच्या हिंदी विषयक निर्णयावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळावे घेत असतील, हे बघून बरं वाटतं. पण हिंदी विषय सक्तीचा निर्णय घेतला तो कोणी, त्यावर सही कोणी केली, आणि आता मेळावा कोणी घेतो, हे मराठी माणसांनी ओळखायला हवं. आम्ही कोणताही दडपण न मानता, मराठी मुलांच्या हिताचाच विचार करू.”



