Chhaava Movie Record : ‘छावा’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, अनेक रेकॉर्ड तोडले

•Chhaava Movie Record Break Performance ‘छावा’ चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पाचव्या दिवशीही या चित्रपटाने उत्कृष्ट कलेक्शन केले असून सिनेमा आता 200 कोटी जवळ
मुंबई :- विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपटगृहात गाजला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. ‘छावा’ रिलीज झाल्यापासून आजपर्यंत तब्बल 200 कोटी पर्यंतचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमला आहे. विकी कौशल यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली असून या सिनेमाने अनेक दिग्गज सिनेमांचे रेकॉर्ड मोडल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाला बजेट पेक्षाही अधिक कमाई केवळ पाच दिवसात झाल्याचे सिनेमातज्ञांनी म्हटले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांना वेड लावत आहे. या चित्रपटाने खूप दमदार सुरुवात केली होती आणि त्यानंतर सुरुवातीच्या वीकेंडला या चित्रपटाने खळबळ उडवून दिली होती.
आता आठवड्याच्या दिवशीही ‘छावा’ तिकीट खिडकीवर जबरदस्त कामगिरी करत आहे. सोमवारी प्रचंड नफा कमावल्यानंतर, चित्रपटाने केवळ 130 कोटी रुपयांचे बजेट वसूल केले नाही तर 10 कोटींहून अधिक नफाही कमावला. मंगळवारीही ‘छावा’ने जबरदस्त कलेक्शन केले आहे. चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर.• SACNILC च्या रिपोर्टनुसार, ‘छावा’ने पहिल्याच दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली होती.•चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 37 कोटींची कमाई केली होती.•तिसऱ्या दिवशी ‘छावा’चे कलेक्शन 48.5 कोटी रुपये होते.अनेक दिग्गज सर्व्हेच्या रिपोर्टनुसार, ‘छावा’ ने रिलीजच्या 5 व्या दिवशी म्हणजेच पहिल्या मंगळवारी 24.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.यासह ‘छावा’ सिनेमाच्या पहिल्या पाच दिवसांत एकूण कमाई आता 165 कोटी रुपये झाली आहे.’छावा’ रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड तोडत आहे. रिलीजच्या पाचव्या दिवशी, चित्रपटाने अजय देवगणच्या शैतानचा आजीवन कलेक्शन रेकॉर्ड मोडला. बॉलीवूड हंगामाच्या आकडेवारीनुसार, भारतातील शैतानचे आयुष्यभराचे कलेक्शन 149.49 कोटी रुपये होते. तर ‘छावा’ने पाच दिवसांत 165 कोटींची कमाई केली आहे.