क्रीडा

Cricket News : शुभमन गिलवर भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी; इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर

20 जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी गिलला कर्णधारपदाची संधी,पंत उपकर्णधार, नव्या चेहऱ्यांना मोठी संधी

BCCI :- भारताचा इंग्लंड दौरा अधिकृतपणे जाहीर झाला असून, बीसीसीआयने (BCCI) कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी सर्वांची नजर लागलेली होती कर्णधारपदावर, आणि अपेक्षेप्रमाणे युवा स्टार शुभमन गिलला संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. ही पाच कसोटी सामन्यांची मालिका 20 जूनपासून लीड्समध्ये सुरू होणार आहे.

गिलसोबतच ऋषभ पंतला उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघात अनेक नवोदित आणि अनुभवी चेहऱ्यांचा समावेश असून, भारताला इंग्लंडमध्ये विजयी कामगिरी करण्यासाठी नवे फॉर्म्युला आजमावण्याची संधी मिळणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ:

  • शुभमन गिल (कर्णधार)
  • ऋषभ पंत (उपकर्णधार)
  • यशस्वी जायसवाल
  • के.एल. राहुल
  • साई सुदर्शन
  • अभिमन्यु ईश्वरन
  • करुण नायर
  • नितीश कुमार रेड्डी
  • रवींद्र जडेजा
  • ध्रुव जुरेल
  • वाशिंगटन सुंदर
  • शार्दुल ठाकुर
  • जसप्रीत बुमराह
  • मोहम्मद सिराज
  • प्रसिद्ध कृष्णा
  • आकाशदीप
  • अर्शदीप सिंह
  • कुलदीप यादव

कसोटी मालिकेचा कार्यक्रम:

  • पहिला सामना: 20 ते 24 जून – लीड्स
  • दुसरा सामना: 2 ते 6 जुलै – बर्मिंघम
  • तिसरा सामना: 10 ते 14 जुलै – लॉर्ड्स
  • चौथा सामना: 23 ते 27 जुलै – मँचेस्टर
  • पाचवा सामना: 31 जुलै ते 4 ऑगस्ट – ओव्हल, लंडन

गिलसाठी ही एक मोठी संधी असून, त्याच्या नेतृत्वात भारत इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0