मुंबईठाणे
Trending

Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यास अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची पुन्हा नियुक्ती!

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; आदित्य ठाकरे न्यासाचे सदस्य, स्मृतिदिनापूर्वी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई :- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या न्यासाच्या (ट्रस्ट) अध्यक्षपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांचीही या न्यासाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी त्यांची या पदावर पुन्हा वर्णी लागली आहे.

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आणि उद्या, सोमवार 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.

न्यासाची पार्श्वभूमी

शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी निवड झाल्यानंतर, 2016 साली उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली या स्मारक न्यासाची स्थापना करण्यात आली होती. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर 2019 साली उद्धव ठाकरे यांनी न्यासाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 2022 साली एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

राजकीय वर्तुळात अनेक बदल झाल्यानंतरही, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पावर उद्धव ठाकरे यांची पुन्हा नियुक्ती करणे, या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0