पुणे

पुणे : सोनसाखळी चोरीतील तीन आरोपींना अटक

•पुणे येरवडा परिसरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे करणाऱ्या तिघांना येरवडा पोलिसांनी अटक केली

पुणे :- पुणे शहरामध्ये जबरीचोरी गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस आयुक्त,पोलीस सह-आयुक्त,अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-4, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांनी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन जबरीचोरी गुन्हे उघडकीस आणणेच्या अनुषंगाने सुचना दिलेल्या होत्या.येरवडा परिसरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे करणाऱ्या तिघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1.75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आसिफ अजगर शेख (वय 32),कुलदिपसिंग युवराजसिंग जुनी (वय 23),मख्खनसिंग लाखनसिंग जुनी, (वय 32) हे तिन्ही आरोपी पाटील इस्टेट, शिवाजी नगर पुणे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.शहरात लूटमार, घरफोड्या तसेच सोनसाखळी आणि पर्स हिसकावणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.तर, काही दिवसांमध्ये येरवडा परिसरात सोनसाखळी व लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. फिर्यादीच्या गळयातील चैन जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेलेबाबत येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पोलीस सोनसाखळी चोरी करणाऱ्या शोध घेत असताना,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अंमलदार विशाल निलख, अमोल गायकवाड यांना बातमी मिळाली संगमवाडी रोडवरुन रात्रीचे वेळी येणारे जाणारे लोकांना लुटणारे संशयीत व्यक्ती संगमवाडीत थांबलेले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केल. त्याप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक प्रदिप सुर्वे व तपास पथकाचे पोलीस अंमलदार विशाल निलख, अमोल गायकवाड, तुषार खराडे, दत्ता शिंदे, प्रशांत कांबळे यांनी तेथे जावून संशयीत एक इसमांना पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीची चौकशी करून त्याच्या इतर साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या वेळी वापरण्यात आलेली ऑटो रिक्षा आणि चैन असा एकूण एक लाख 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0