क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

मध्यरात्रीचा थरार : चाकूचे वार करून मोबाईल व रोकड लुटणारे चौघे पकडले

Vasai Crime Branch 2 Latest News : रक्तबंबाळ तरुणावर जीवघेणा हल्ला – काही तासांत गुन्हे शाखा-2 वसईचा सापळा

वसई :- आचोळे-नालासोपारा रोडवर मध्यरात्री रक्त गोठवणारा थरार उभा राहिला. एका तरुणाला स्कूटीवरून आलेल्या टोळक्याने अडवले, चाकूचे वार करून छाती-पोटावर जखमा केल्या आणि हातातील मोबाईलसह खिशातील रोकड हिसकावून पोबारा केला. Vasai Latest Crime News हा जीवघेणा प्रसंग काही क्षणात घडला, मात्र गुन्हे शाखा-2 Vasai Crime Branch Unit 2 वसईच्या पथकाने विजेच्या वेगाने कारवाई करून टोळक्याला जेरबंद केले.

2 सप्टेंबर रोजी पहाटे साडेदोनच्या सुमारास धनंजय कुलेखर यादव (32, रा. वसंत नगरी, वसई पूर्व) पायी जात असताना तीन स्कूटीस्वारांनी त्यांना अडवले. सुरा चमकावत त्यांनी पोटावर, छातीवर आणि पाठीवर वार करून त्यांना रक्तबंबाळ केले. त्यानंतर मोबाईल आणि तब्बल दोन हजार रुपयांची रोकड हिसकावून अंधारात पसार झाले. जखमी यादव यांनी कसाबसा जीव वाचवला आणि पोलीस मदतीसाठी धावले.

अल्पवयीनासह चौघांचा अटकेत समावेश, चोरीचा मोबाईल व दुचाकी हस्तगत

गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदार आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे काही तासांतच आरोपींवर पोलिसांनी जाळं टाकलं. या धाडसी कारवाईत अरमान इस्माईल शेख (19 वय), सुफीया नगुलामफरिद शेख (18 वय), राज रमेश उपाध्याय उर्फ पांडे (19 वय) आणि एक 17 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ॲक्टीव्हा स्कूटी, चोरीस गेलेला मोबाईल आणि आरोपींचे मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी सर्व आरोपींना आचोळे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. युनिट-2 वसईचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने ही थरारक मोहीम यशस्वी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0