
Sanjay Raut On Thackeray Brother : मोदी-शहांना दाखवून देऊ, महाराष्ट्र कधीही झुकत नाही” — संजय राऊत
मुंबई – “शिवसेनेचे “टायगर अभी जिंदा है!”… महाराष्ट्र अजूनही जागा आहे,” असे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. Sanjay Raut On Thackeray Brother 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असून, मराठी विजय दिनानिमित्त शिवतीर्थावर विजयी सभा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
संजय राऊत म्हणाले, “नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दुर्बल करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही अजून आहोत — टायगर अभी जिंदा है! 5 तारखेला आम्ही त्यांनाही बोलवणार आहोत, बघा कशी मराठी एकजूट असते.”
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या तयारीनं राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. राऊत म्हणाले, “राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही शिवतीर्थावर कार्यक्रम घेण्याची परवानगी मागितली आहे, पण ती मिळालेली नाही. यावर राज ठाकरे यांनी पर्यायी सभागृह सुचवले आहे.”
राऊतांनी यावेळी भाजप सरकारच्या भूमिकेवरही टिका करत फडणवीस यांना सुनावलं, “तुम्ही जीआर काढून शिवसेना जन्माला घातल्याच्या गोष्टी सांगता, पण ती स्थापना मनातली होती, कागदावरची नव्हे.”
विजयी सभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, डाव्या पक्षांनाही निमंत्रण दिलं जाणार असून, ही सभा पक्षपाताच्या पलीकडे जात महाराष्ट्राच्या अस्मितेचा एल्गार ठरेल, असं राऊतांनी स्पष्ट केलं.


