Sanjay Raut : ‘वक्फ दुरुस्ती विधेयक आणि हिंदुत्व…’ देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार प्रहार

Sanjay Raut on Waqf Amendment Bill : लोकसभेत सादर करण्यात आलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला आहे. यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार प्रहार केला.
मुंबई :- केंद्र सरकारने बुधवारी (२ एप्रिल) लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केले. याबाबत चर्चा सुरू आहे. Sanjay Raut on Waqf Amendment Bill विरोधी पक्ष या विधेयकाला विरोध करत आहेत. दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.
फडणवीस यांच्या पोस्टला उत्तर देताना ते म्हणाले, “देवेंद्र जी,वक़्फ़ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही,ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची!विषय राहुल गांधींचा ,त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता !
तुमच्यात हा दम आहे?
देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट केले होते,वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत ! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्सवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केल्याचा फोटो ट्विट करत नितीश कुमार,चंद्राबाबू नायडू काय म्हणतात ते बघा
नंतर इतरांना अकलेचे डोस पाजा. म्हटले आहे.


