क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Kalyan Police News : पावसात ‘दारू आनंद’! कल्याण पूर्वेतील मोकळ्या मैदानांवर 44 टवाळखोर तरुणांकडून गोंधळ, पोलिसांची धडक कारवाई

Kalyan Police Take Action Against Drinkers : शांतता भंग करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा, दारूबंदी कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल

कल्याण | पावसाच्या नाजूक थंडीत कल्याण पूर्वेतील मोकळ्या मैदानांवर रंगले ‘दारू आनंद’! Kalyan Police Take Action Against Drinkers 44 टवाळखोर तरुण सार्वजनिक ठिकाणी झाडाझुडपांचा आधार घेऊन दारू पिऊन गोंधळ घालत असताना कोळसेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

या मद्यपान करणाऱ्या तरुणांमुळे महिलांसह परिसरातील नागरिकांवर प्रचंड त्रास होत होता, तसेच शांतता भंग होत असल्याने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सखोल शोध मोहीम राबवली.

पोलिसांनी रस्त्यावर धिंगाणा करणाऱ्या, काळोखात दारू पिणाऱ्या तरुणांना रोखून ठाण्यात आणले. सुरुवातीला पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या या टवाळखोरांवर महाराष्ट्र पोलीस कायदा आणि दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून कडक कारवाईने सार्वजनिक दारू अड्डे बंद झाले होते, पण पावसाच्या आगमनानंतर पुन्हा ही वाईट सवय सुरु झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी शाश्वत शांततेसाठी मनापासून दिलासा व्यक्त केला आहे.

कोळसेवाडी पोलिस आता सतर्क आहेत आणि पुन्हा अशा प्रकारच्या उपद्रवांना मोकळा द्यणार नाहीत, अशी माहिती वरिष्ठांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0