क्राईम न्यूजठाणेमुंबई

Navi Mumbai Robbery News : पहाटेच्या अंधारात जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद; नवी मुंबई पोलिसांनी एकाच झटक्यात 10 गुन्हे उघडकीस आणले

Navi Mumbai Latest Robbery News : नेरुळमध्ये महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले, सीसीटीव्हीमुळे आरोपीचा पर्दाफाश; आईही गुन्ह्यात सहभागी असल्याचा खुलासा

नवी मुंबई :- पहाटेच्या वेळी पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या एका टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. या कारवाईत पोलिसांनी आई आणि मुलाला अटक केली असून, त्यांच्या अटकेमुळे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. Navi Mumbai Latest Robbery News

28 ऑगस्ट 2025 रोजी नेरुळ येथे एक धक्कादायक घटना घडली होती. फिर्यादी अलका उत्तम वाघमोडे या पायी जात असताना, एका मोटारसायकल चालकाने त्यांना धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील 80 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडले आणि पळ काढला होता. या घटनेनंतर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाढत्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हे शाखेला तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते.

सीसीटीव्हीने आरोपीचा छडा
गुन्हे शाखा कक्ष-2 (बेलापूर) च्या पथकाने या गुन्ह्याचा तपास हाती घेतला. त्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीची सांगड घालून आरोपीचा माग काढला. या तपास मोहिमेदरम्यान, पोलिसांनी सर्फराज उर्फ लाला उमर कुरेशी (21 वय) याला उल्वे परिसरातून ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत सर्फराजने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने नेरुळ, सीबीडी, उल्वे आणि खारघर परिसरात आपल्या साथीदारांच्या मदतीने आणखीही जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही चोरीची होती. तपासात आरोपीची आई जायदा उमर कुरेशी (40 वय) हिचाही सहभाग असल्याचे समोर आल्याने तिलाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी या आरोपींकडून एकूण 6 लाख 37 हजार 190 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि चोरीची मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी सहायक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे. या पथकात सपोनि चव्हाण, देसाई, राजश्री शिंदे (एएचटीयू), पोलीस उपनिरीक्षक देशमुख, पवार, पोलीस हवालदार धनवटे, दुधाळ, जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0