Bhiwandi Bribe News : भिवंडीत ग्रामविकास अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडली

Bhiwandi ACB Trap News : रस्त्याच्या देयकासाठी मागितली होती 30 हजार रुपयांची लाच, एसीबीची कारवाई
भिवंडी: कंत्राटदाराच्या कामाचे बिल पूर्ण करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बोरीवली (पडघा) येथील ग्रामविकास अधिकारी विद्या बनसोडे (वय 46) यांना सोमवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात Padgha Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Bhiwandi Latest Bribe News
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कंत्राटदाराने पडघा येथील बोरीवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे मंजूर बिल काढण्यासाठी ते ग्रामविकास अधिकारी विद्या बनसोडे यांच्याकडे गेले.
बनसोडे यांनी देयकाची संपूर्ण रक्कम हवी असल्यास देयकाच्या तीन टक्के, म्हणजे 30 हजार रुपये लाच म्हणून देण्याची मागणी केली. या प्रकारामुळे त्रासलेल्या कंत्राटदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
एसीबीने या तक्रारीची पडताळणी करून सोमवारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, ग्रामविकास अधिकारी बनसोडे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणी त्यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.


