Tejashwi Ghosalkar Resigns : तेजस्वी घोसाळकर यांचा पदाचा राजीनामा…शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र…?

Uddhav Thackeray shock in Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उत्तर मुंबईत मोठा धक्का बसला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिला आहे.
मुंबई :- मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर Tejashwi Ghosalkar Resigns यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सर्व पदांचा राजीनामा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्या माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून, तर काही काळापूर्वी हत्या झालेले ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत.त्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाशी जवळचे संबंध असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. यामुळे उत्तर मुंबईत ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली होती. त्यानंतर आता त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


