मुंबई

Mumbai Police News : नवघर पोलिसांकडून 15 एप्रिल रोजी बेवारस वाहनांचा लिलाव

•नवघर पोलीस ठाण्यातील 7 बेवारस वाहनांचा लिलाव, 14 एप्रिल पर्यंत दिली मुदत

भाईंदर :- नवघर पोलिस ठाण्यातील बेवारस दुचाकी वाहनांचा लिलाव मंगळवार 15 एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी दिली. 14 एप्रिल पर्यंत वाहनांची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना मुदत दिले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

नवघर पोलिस ठाण्याच्या आवारात सुमारे 7 दुचाकी वाहने गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहेत.संबंधित वाहने घेऊन जाण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर, चासी नंबर, इंजिन नंबर यांच्या माहितीसह यापूर्वी आवाहन केले होते. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नाही. या वाहनांचा ताबा घेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे बेवारस वाहनांचा स्क्रॅपमध्ये लिलाव करण्यात येणार आहे. या लिलाव प्रक्रियेमध्ये ज्या भंगार विक्रेते दुकानदारांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी शॉप ॲक्ट परवाना, आधार कार्ड या कागदपत्रांसह नवघर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0