महाराष्ट्र
Trending

केंद्राकडून 8 व्या वेतन आयोगास अखेर मंजुरी; 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा फायदा

•न्यायमूर्ती रंजना देसाईंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन; 18 महिन्यांत सादर होणार शिफारसी

ANI :- केंद्र सरकारने तब्बल दहा महिन्यांहून अधिक काळ प्रतीक्षेत असलेल्या आठव्या वेतन आयोगास (8th Pay Commission) अखेर मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या 50 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांची आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली असून, त्यांना मोठ्या आर्थिक सुधारणांचा फायदा मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महत्त्वपूर्ण घोषणेची माहिती दिली. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या नवीन वेतन आयोग समितीच्या अध्यक्ष असतील, तर त्यांच्याबरोबर प्राध्यापक पुलक घोष आणि पंकज जैन यांची देखील सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ही समिती वेतन संरचना आणि भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने कार्य करेल आणि 18 महिन्यांच्या आत आपल्या शिफारसी केंद्र सरकारला सादर करेल.

शेतकऱ्यांसाठी 37 हजार कोटींचे अनुदान

दरम्यान, केंद्र सरकारने या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठीही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने पोषक तत्त्वांवर आधारित अनुदानास (NBS) मान्यता दिली असून, रब्बी पिकांच्या उत्पादनासाठी 37,952 कोटी रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांच्या खिशावरील आर्थिक ओझं थोडं कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या या दुहेरी निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसह शेतकरी वर्गालाही दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0