ठाणे

Thane Crime : घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक ; दोन्ही आरोपींवर सहा गुन्हे दाखल

•ठाणे परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 3 गुन्ह्यांची उकल झाली

ठाणे :- ठाणे, कळवा परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 3 गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, कॅमेरा, ऑटोरिक्षा पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. दोन्ही आरोपींवर मुंबई,नवी मुंबई आणि ठाणे येथील विविध पोलीस ठाण्यात सहा-सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

सुहासिनी दिगंबर विचारे यांच्या कळवा येथील घरामध्ये मुख्य दरवाजाचे लॉक तोडून प्रवेश करून कपाटांमधील 55 ग्रॅम सोन्याचे दागिने 60 ग्रॅम चांदीच्या दागिने अशा एकूण तीन लाख 51 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305, 331 (3),331(4),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी गुन्हे शाखा घटक-1, ठाणे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक कौशल्य आणि गोपनीय बातमीदारा मार्फत आरोपींची ओळख पोलिसांनी केली. त्यानंतर दोन आरोपींचा पोलिसांनी शोध घेऊन गुन्ह्यात अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी युसुफ नुरइस्लाम शेख (वय 28 रा. मुंब्रा),मारूक नासीर शेख (वय 30) अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तीन लाख दोन हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, तसेच वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केलेल्या दोन लाख 16 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने, 80 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने, कॅमेरा आणि गुन्ह्यात वापरलीले रिक्षा यासर्व तीन गुन्ह्यातील सर्व मिळून सहा लाख 98 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलीस पथक

अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-1 ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा घटक-1 ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस निरीक्षक दीपक घुगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद नाईक, सुनिल माने, पोलीस हवालदार संदीप महाडीक, धनंजय आहेर, पोलीस शिपाई सागर सुरळकर, बाळू मुकणे आणि शशीकांत सावंत यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0