क्राईम न्यूजमहाराष्ट्रसांगली-मिरज
Trending

Sangli Girl Suicide: सांगलीच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा

Sangli Girl Suicide: करगणी आत्महत्याप्रकरणाचा राजकीय वादात बदल,गोपीचंद पडळकरांविषयी जयकुमार गोऱ्यांचं ‘बजेटप्रेम’ चर्चेत

सांगली :- सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येने स्थानिक राजकारण चांगलेच तापवले आहे. Sangli Girl Suicide या प्रकरणात भाजप आणि शिंदे गटातील स्थानिक आमदारांचे समर्थक एकमेकांवर थेट हस्तक्षेपाचे आरोप करत असून, दोन्ही गटांनी संबंधित आमदारांच्या कॉल डिटेल्सच्या चौकशीची मागणी केली आहे.

भाजपकडून आमदार सुहास बाबर यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी व्हावी, यासाठी थेट निवेदनच सादर करण्यात आले. दुसरीकडे शिंदे गटाचे समर्थक भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या कॉल डिटेल्स गृहविभागाकडून मागवावेत, अशी मागणी करीत आहेत. या घडामोडींमुळे करगणी आत्महत्याप्रकरणाला राजकीय रंग चढल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी गोपीचंद पडळकर यांची भलावण करत, “माझ्या खात्याचा पूर्ण बजेट कोटा पडळकरांसाठी द्यायलाही मी तयार आहे,” असे विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. गोरे यांनी पडळकरांना “मुद्द्याने आणि गुद्याने लढणारा नेता” असे संबोधले, तर बारामतीवर टिका करत फडणवीसांच्या योगदानामुळे दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचल्याचेही आवर्जून नमूद केले.

या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील राजकारणात अंतर्गत संघर्ष, निधीवाटपातील दुजाभाव, आणि आत्महत्येसारख्या गंभीर प्रकरणांचा राजकीय फटका असा त्रिसूत्रीय संघर्ष सध्या पाहायला मिळतो आहे. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अजून तीव्र होण्याची चिन्हं आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0