मुंबई

Sanjay Raut : 5 जुलैचा ‘विजयी मेळावा’ ऐतिहासिक ठरणार – ठाकरे बंधूंच्या एकतेने सत्ताधाऱ्यांची झोप उडाली!

•Sanjay Raut On Vijayi Melava : शिवसेनेतून गेलेल्यांच्या पोटात आता भीतीचा गोळा” – संजय राऊतांचा घणाघात

मुंबई :– महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक टप्पा ठरणाऱ्या 5 जुलैच्या ‘विजयी मेळावा’साठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येत असून, राज्यातील विरोधी पक्ष व संघटनांचा या मेळाव्याला भक्कम पाठिंबा मिळाला आहे. वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम येथे होणारा हा मेळावा मराठी अस्मितेच्या एकजुटीचे प्रतिक ठरणार असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषतः शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. “5 जुलै हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक ठरेल. ठाकरेंच्या एकतेची कल्पनाच काहींना सहन होत नाही,” असे म्हणत राऊत यांनी टीकाकारांना खडसावले.

“जे शिवसेना सोडून गेले, ते जुने सहकारी आता पोटात गोळा धरून भीतीतून बोलत आहेत. त्यांची वैफल्यता त्यांच्या वक्तव्यांमधून स्पष्ट होते,” असा खरमरीत टोला त्यांनी लगावला. रामदास कदम, नारायण राणे यांच्यावरही राऊतांनी शब्दबाण सोडले आणि त्यांची विधानं म्हणजे ‘भीती आणि असुरक्षिततेतून येणाऱ्या प्रतिक्रिया’ असल्याचे म्हटले.

राऊत म्हणाले की, “जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाहीत, ते आज उद्धव-राज ठाकरेंवर टीका करत आहेत. पण जे आमच्यातून गेलेत, त्यांनी आता फक्त मोदी, शाह आणि फडणवीस यांच्या आज्ञा पाळाव्यात. त्यांना आमच्याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकारच उरलेला नाही.”

गिरीश महाजनांवरही त्यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, “गुंड टोळ्या चालवणं हेच महाजनांचं राजकारण आहे.” तर शिंदे गटातील अनेक नेत्यांचे भवितव्य संपुष्टात येत असल्याचा दावा करत, “ही मंडळी केवळ चारासारखे भांगमध्ये कल्पना करत आहेत,” असे उपरोधिक भाष्यही त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0