मुंबई
Trending

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

Eknath Shinde Latest News : एका आठवड्यात शिंदेंचा दुसरा दिल्ली दौरा; ‘इंडिया’ आघाडीची बैठक आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय टायमिंगची चर्चा

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पडद्यामागे मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी बुधवारी दिल्लीला जाणार असतानाच, त्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde हे आज रात्री अचानक दिल्लीला रवाना होणार आहेत. एकाच आठवड्यात शिंदे यांचा हा दुसरा दिल्ली दौरा असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री उशिरा दिल्लीला पोहोचणार असून, उद्या दिवसभर त्यांच्या विविध बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये ते त्यांच्या पक्षाच्या खासदारांसोबत आगामी रणनीतीवर चर्चा करणार आहेत. विशेषतः, शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या रात्रीच्या दिल्ली भेटीने राज्यात मोठी खळबळ उडवली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच होत असलेल्या या भेटीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0