मुंबई

Thane News : “दहशतचा पुनर्जन्म”: साकिब नाचनवर एटीएसचा घाव

•मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार पुन्हा सक्रिय; आयएसआयसच्या जाळ्यातील कडी उघडकीस

ठाणे :- राज्यात दहशतीच्या नव्या जाळ्याचा पर्दाफाश करत महाराष्ट्र एटीएसने ठाणे जिल्ह्यातील पडघा परिसरात मोठी कारवाई केली आहे. बंदीघात असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या माहितीवरून, कुख्यात साकिब नाचनच्या निवासस्थानी एटीएसने छापा टाकला.

साकिब नाचन — एकेकाळी स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) चा प्रमुख सदस्य, ज्याने मुंबईतील विलेपार्ले, मुलुंड आणि सेंट्रल रेल्वे स्थानक बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग घेतला होता — याने शिक्षा भोगल्यानंतर पुन्हा कट्टरपंथी तळ ठोकल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, एटीएसच्या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली — 27 वर्षीय इंजिनियर रविंद्र वर्मा हा फेसबुकवर एका बनावट महिला प्रोफाईलच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी (PIO) जोडला गेला होता. त्याने भारत सरकारच्या संरक्षणाशी संबंधित संवेदनशील माहिती त्या एजंटसोबत शेअर केली होती.

सुरक्षा कंपनीत काम करणाऱ्या या तरुणाला आता पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून, त्याच्याविरोधात गुप्त माहिती उघड केल्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0