Mumbai Crime News : “मूक बालकावर अमानुषता: गतिमंद मुलाला मॉलमध्ये मारहाण”

•वांद्रेतील घटनाचित्र व्हॉट्सअॅपवर व्हायरल; आईला दोन दिवसांनी समजला अत्याचार
मुंबई | वांद्रेतील एका मॉलमध्ये एका चार वर्षांच्या गतिमंद मुलावर अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलाला काळजीपूर्वक सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या गृहसेविकेनेच त्याच्यावर हात उगारल्याचा प्रकार 23 जून रोजी व्हॉट्सअॅपवर फिरलेल्या चित्रफितीमुळे उघड झाला.
गृहसेविकेविरुद्ध बालक संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल, समाजात संताप
पीडित मुलगा भायखळा परिसरात आपल्या पालकांसोबत राहतो. गतिमंद असल्यामुळे त्याच्या देखभालीसाठी मागील अडीच वर्षांपासून ललिता सौनापात्रावालाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, २१ जून रोजी वांद्रेतील एका मॉलमध्ये फिरवण्यासाठी नेलेल्या ललिताने त्याच मुलाला जिन्यावरून फरफटत नेत अमानुष मारहाण केली.या घटनेचा व्हिडीओ एका सतर्क महिलेने मोबाईलमध्ये चित्रीत करून समाजमाध्यमावर प्रसारित केला. हा व्हिडीओ आईपर्यंत पोहोचल्यावर तिने बीकेसी पोलीस ठाण्यात तक्र


