क्राईम न्यूज
Trending

Pune Police MPDA Action | नांदेडसिटी हद्दीतील गुन्हेगारांवर आता थेट एमपीडीए

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्याकडून कडक कारवाई

पुणे, दि. ५ जून, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
: (Pune Crime News)

Pune Police MPDA Action | शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर आता थेट एमपीडीए कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. नांदेडसिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस यांनी शस्त्रे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारावर थेट एमपीडीए कारवाई केली आहे.

आरोपी साजन विनोद शहा, वय १९ वर्षे, रा. फ्लॅट नं ३०२, पोकळे क्रिस्टल, भैरवनाथ मंदिरजवळ, धायरी, पुणे पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून तो सन २०२४ पासून आपल्याजवळ घातक अग्नी शस्त्रे जवळ बाळगणे, दुखापत करणे, मारामारी करणे, चोरी करणे सारखे गुन्हे केले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये त्याची मोठी दहशत निर्माण झाले आहे. त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर काहीएक परिणाम झाला नाही. त्याच्या अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याच्या भितीमुळेनागरीक उघडपणे तक्रार देण्यास तयार होत नव्हते. Pune Crime News

गुन्हेगार साजन विनोद शहा यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्द करण्यासाठी अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, संभाजी कदम, पोलीस उप आयुक्त, परि.-३, पुणे, अजय परमार, सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे दिलेल्या सुचनांप्रमाणे अतुल भोस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नांदेडसिटी, पोलीस स्टेशन पुणे, दत्तात्रय मोरे पोलीस निरीक्षक गुन्हे, नांदेडसिटी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी, यांचे मार्गदर्शनाखाली सर्व्हेलन्स पथकाचे पोउनि संतोष कदम पो. अंमलदार प्रथमेश गुरव यांनी एम.पी.डी.ए. प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे पाठवीला होता.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी रेकॉर्डवरिल सराईत गुन्हेगार साजन विनोद शहा यास एम.पी.डी.ए. कायदयान्वये एक वर्षे जालना कारागृह, जालना येथे स्थानबध्द करण्याचा आदेश पारित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0