मुंबईक्राईम न्यूज
Trending

Virar Crime News : विरारमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत चोराला उत्तर प्रदेशातून अटक, 7.40 लाखांचा ऐवज जप्त!

Virar Police Latest Crime News : मालवणीतील ‘फैय्या’ उर्फ समीर जौनपूरमधून जेरबंद; मुंबईतून 4 वर्षांसाठी होता हद्दपार

विरार :- विरारमधील एका घरफोडीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या सराईत गुन्हेगार मोहम्मद वसीम ईसाक शेख उर्फ फैय्या उर्फ समीर (वय 35) याला उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून अटक करण्यास गुन्हे शाखा कक्ष-3 विरारच्या पथकाला यश आले आहे. त्याच्या अटकेमुळे 7 लाख 40 हजार रुपयांच्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, इतरही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. Virar Latest Crime News

गुन्हे शाखेच्या धडक कारवाईने अनेक गुन्हे उघडकीस

दिनांक 22 जुन 2025 रोजी रात्री ते पहाटे दरम्यान, पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बंद घरात अज्ञात चोराने स्लायडिंग खिडकी तोडून प्रवेश केला होता. चोरट्याने कपाटाचे लॉक तोडून त्यातील सोने-चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 7.40 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात कलम 331(3), 331(4), 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घरफोडीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे आणि गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा कक्ष-3 ने समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत असताना, संशयित आरोपी मोहम्मद वसीम ईसाक शेख उर्फ फैय्या उर्फ समीर, जो मूळचा जौनपूर, उत्तर प्रदेशचा असून, मुंबईतील मालवणी, मालाड पश्चिम येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी मोहम्मद वसीम ईसाक शेख याच्या पूर्वाश्रमीचा इतिहास पाहता, त्याला यापूर्वी चार वर्षांसाठी मुंबई आणि उपनगर परिसरातून हद्दपार करण्यात आले होते. त्याच्यावर यापूर्वीही 17 हुन अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे, ज्यामुळे तो एक सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, पोलीस अंमलदार राकेश पवार, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, प्रवीण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे (सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष-३) आणि सायबर पोलीस ठाण्याचे संतोष चव्हाण यांनी ही उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0