क्राईम न्यूज
Trending

Koregaon Park Rape Case | महाविद्यालयाच्या ट्रस्टीकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ? सोशल मीडियावर चर्चाना उधाण : गुन्ह्यात ट्रस्टीचा समावेश होणार का?

Koregaon park rape case

  • पुण्यात मुलींवरील अत्याचारात वाढ

पुणे, दि. २८ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Koregaon Park Rape Case

पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून कोरेगाव पार्क येथील महाविद्यालात शिक्षण घेत असलेल्या मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याची घटना ‘गुड टच बॅड टच’ कार्यक्रमात उजेडात आली. यानंतर पुणे पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत तरुणीचे सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघांविरुद्ध पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु महाविद्यालयाच्या ट्रस्टीकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे सोशल मीडियावर चर्चाना उधाण आले आहे. Koregaon Park Rape Case

तरुणीवर बलात्कार झाल्याची माहिती बाहेर येऊ नये म्हणून अनेक हालचाली झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यातच यातील एका ट्रस्टीचे संबंध कॅबिनेट मंत्र्यांशी असल्याचे समोर आले आहे. Koregaon Park Rape Case

बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाबून ठेवून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रस्टीविरुद्ध पोलीस आयुक्त कारवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. Koregaon Park Rape Case

पोर्श अपघात प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी न्यायाची भूमिका घेत बिल्डरच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आरोपी केले होते. याप्रकरणी देखील मुलीचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या व आरोपीना पाठीशी घालणाऱ्या ट्रस्टी विरुद्ध गुन्हे दाखल होतील असा कयास लावला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0