MUMBAI NEWS : अडचणीतील शेतकरी कुटुंबाला तातडीने बैल व नुकसान भरपाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता
मुंबई MUMBAI NEWS: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर ओढवलेली बिकट परिस्थिती समजताच त्यांना तातडीने मदत केली. वीज पडून बैल दगावल्याने पत्नीला जोखडाला जुंपण्याची वेळ आलेल्या या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासांत एक बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कम मिळाली आहे.MUMBAI NEWS

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्याकडे असणाऱ्या बैलाचा शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसात वीज पडून मृत्यू झाला. त्यामुळे काशिनाथ यांना शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी पत्नी हौसाबाई यांना जोखडाला जुंपावे लागले, हे वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले.MUMBAI NEWS
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूरचे जिल्हाधिकारी तसेच सर्व यंत्रणांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तहसील कार्यालयासह, पशूसंवर्धन, कृषी आदी सर्व यंत्रणा गायकवाड यांच्यापर्यंत पोहचल्या. पशूसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक एक बैल उपलब्ध करून घेतला आणि तो जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थेट गायकवाड कुटुंबियांकडे सुपूर्द केला.MUMBAI NEWS
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या संवेदनशील हाताळणीमुळे गायकवाड कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले.
MUMBAI NEWS



