
Mumbai Latest Crime News : अश्लील चित्रीकरण करून मुलीवर वारंवार अत्याचार; एका आरोपीला अटक, पाच बालसुधारगृहात
मुंबई :- मुंबईतील काळाचौकी परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यातील एका 27 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर इतर पाच अल्पवयीन आरोपींना डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. Mumbai Latest Crime News
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एका 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीने मुलीला एका 27 वर्षीय आरोपीच्या घरी नेले. तिथे तिच्यावर बलात्कार करून त्याचे अश्लील चित्रीकरण करण्यात आले. या चित्रीकरणाचा वापर करून आरोपींनी मुलीला वारंवार ब्लॅकमेल केले आणि इतर चार अल्पवयीन आरोपींनीही तिच्यावर अत्याचार केले.
हा संपूर्ण प्रकार एका अल्पवयीन आरोपीच्या प्रेयसीमुळे समोर आला. पीडित मुलगी आणि तिच्या प्रियकराचे संबंध असल्याचा संशय आल्याने तिने पीडितेच्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने तपासणी केली असता तिच्या फोनमध्ये अश्लील चित्रीकरण आढळून आले. आईने मुलीला विचारले असता हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघड झाला.
या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन काळाचौकी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी आरोपींचे मोबाइल जप्त केले असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.


