मुंबई
Trending

Rohit Pawar : पत्त्यांचा खेळ, राजकीय ठिणग्या! कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल; निवेदनाच्या वेळी पत्ते फेकले, कार्यकर्त्यांमध्ये राडा

Rohit Pawar Shared Tweet : छावा संघटनेवर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मारहाण; सूरज चव्हाणही दिसले सहभागी

मुंबई :- राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे Manikrao Kokate यांचा विधानभवन परिसरात मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरू झालेल्या वादात आता हातघाईची ठिणगी पडली आहे. कृषी मंत्र्यांची हकालपट्टी व्हावी, यासाठी लातुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना पत्रकार परिषदेनंतर बेदम मारहाण केली. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण सहभागी असल्याचा आरोपही व्हायरल व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.

या संपूर्ण प्रकारावर राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “राज्याचा शेतकरी संकटात असताना, कृषी मंत्री सभागृहात पत्ते खेळत असतील तर जनतेचा संताप स्वाभाविक आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी छावा कार्यकर्त्यांनी पत्ते फेकणे चुकीचे असल्याचे मान्य करताना, त्यानंतर झालेली मारहाण अधिक निंदनीय असल्याचा उल्लेख केला.

काय आहे प्रकरण?

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवन परिसरातील कथित व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर झळकला. त्यात ते मोबाईलवर ‘रमी’सारखा पत्त्यांचा खेळ खेळताना दिसत आहेत. यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून प्रचंड टीका झाली. याच पार्श्वभूमीवर लातूरमधील दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. निवेदन देताना त्यांनी निषेधाचा भाग म्हणून प्रतिकात्मक पत्ते त्यांच्या समोर फेकले. मात्र त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत पत्रकार परिषद संपल्यानंतर छावा कार्यकर्त्यांवर हल्ला केला.

हा सर्व प्रकार व्हिडिओ स्वरूपात समोर आला असून, त्यावरून राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हं आहेत. “सत्ताधाऱ्यांनी प्रश्न विचारणाऱ्यांना फटके देण्याची भाषा सुरू केली आहे का?” असा सवाल रोहित पवार यांनी करत सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0