मुंबई

Bhiwandi Crime News : लॅपटॉप चोरी करणाऱ्या दोघांना अटके कर्नाटकामधून अटक

•23.40 लाख रुपयांचे तब्बल 26 नवे कोरे लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळीला कर्नाटक मधील यादगीर येथून अटक करण्यात भिवंडी पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाने ही कारवाई केली.

भिवंडी :- भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 23.40 लाख रुपयांचे 26 लिनोव्हा कंपनीचे लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना कर्नाटक मधील यादगीर येथून अटक करण्यात भिवंडी पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 मार्च 2025 च्या दरम्यान नारपोली पोलीस ठाण्यात लॅपटॉप चोरी संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्ह्याचा समांतर तपास करण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांनी मिळालेल्या गुप्त बातमी व तसेच सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी हे कर्नाटक राज्यातील जिल्हा यादगिर येथील एका कन्याकोळ तांडा गावात असल्याचे पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाली होती. पोलिसांचा एक पथक कर्नाटक राज्यात जाऊन दोन आरोपींना अटक केली आहे. दिलीप बसवराज चव्हाण (20 वय) आणि अर्जुन मुन्ना राठोड (23 वय रा. पूर्णागाव भिवंडी) असे अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 26 लॅपटॉप आणि एक मोटरसायकल असा एकूण 24 लाख 65 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी गोडाऊनची रेकी करून चेन्नई व हातोड्याच्या साहाय्याने भिंत फोडून लॅपटॉप चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले आहे तसेच आरोपींवर यापूर्वीही भिवंडी तालुका पोलीस ठाणे येथेही चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, शोध -1, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, प्रशांत राणे,सुदेश घाग, सचिन जाधव, पोलीस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत,विजय कुंभार यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0