Credit Card Fraud News : “क्रेडिट कार्ड लिमिट वाढवतो” म्हणत दिल्लीहून साडेचार लाखांचा ऑनलाईन गंडा!

Mumbai Latest Credit Card Fraud News : बनावट कॉल सेंटरवर पोलिसांची छापामारी; मुख्य सूत्रधार अटकेत, 11 जण ताब्यात
मुंबई | क्रेडिट कार्डवरची ‘लिमिट’ वाढवण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एका मुंबईकराची साडेचार लाखांची फसवणूक केली आहे. Credit Card Fraud या घटनेनंतर शीव पोलिसांनी थेट दिल्ली गाठून बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला आणि 11 जणांना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी मनजीत कुमार महावीर सिंग यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. Mumbai Latest Cyber Crime News
मोबाईलवर लिंक पाठवून माहिती उकळली, 16 पेक्षा अधिक फसवणुकीचे पुरावे
28 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादीला आलेल्या एका फोनने ही फसवणूक घडली. “मी अॅक्सिस बँकेतून बोलतो, तुमचं कार्ड लिमिट वाढवायचंय का?” अशा बोलण्याने सुरुवात झाली आणि पुढे पाठवलेल्या लिंकवर क्लिक करताच 4 लाख 54 हजार 717 रूपयांची च्या रक्कमेवर डल्ला मारण्यात आला.
गुन्हा दाखल होताच शीव पोलिसांच्या सायबर सेलने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दिल्लीतील इंटरनेटी इंटेलेक्शन नावाच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करत पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं. आरोपी कॉल सेंटरमधून शेकडो नागरिकांना फोन करून बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगत होते आणि लिंक पाठवून कार्ड डिटेल्स गोळा करत होते.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मनजीत कुमारकडे चौकशी केली असता, त्याच्या टोळीने महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील नागरिकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, इतर फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी एकूण 8 मोबाईल, 8 सिमकार्ड आणि 4.17 लाखांची रोकड हस्तगत केली आहे.सायबर क्राईम पोर्टलवर 16 पेक्षा अधिक ऑनलाईन तक्रारी या टोळीविरोधात दाखल आहेत.
पोलीस आयुक्त, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी (कायदा व सुव्यवस्था), अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने (मध्य प्रादेशिक विभाग), पोलीस उप आयुक्त, रागसुधा आर, परिमंडळ 04, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र थिवार (सायन विभाग), यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीव पोलीस ठाणे मनीषा शिर्के, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक नारायण मिसाळ, सायबर अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय खाडे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश खामकर, खामकर, पोलीस शिपाई कुंभार,जाधव, ठाकुर, पोलीस हवालदार ठोके (तांत्रिक मदत) यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता गतिमान कारवाई करून उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.


