Virar Crime Branch : विरारमध्ये हातभट्टीवर ‘क्राईम ब्रांच’चा छापा; 1.13 लाखांचा मुद्देमाल नष्ट, महिला आरोपीवर गुन्हा

Virar Crime Branch Busted Alcohol Spot In Virar : 3000 लिटर रसायन आणि दारू तयार करण्याचे साहित्य जप्त; विरार पोलिसांत गुन्हा दाखल
विरार :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या (क्राईम ब्रांच) कक्ष-4 Virar Crime Branch Unit 4 ने विरार पूर्व परिसरात मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे 1 लाख 13 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात यश मिळवले आहे. Virar Latest Crime News
कारवाईचा तपशील
दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 च्या पथकाने विरार पूर्व, बरफ पाडा, लहानगेपाडा येथील समाज मंदिरा जवळील शेतात छापा टाकला. Virar Breaking News
या कारवाईत खालील मुद्देमाल मिळून आला:
3,000 लिटर नवसागर, गूळ मिश्रित रसायन
21 लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू
गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारी साधने
या सर्व मुद्देमालाची अंदाजित किंमत 1.13 लाख इतकी आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार संदिप लक्ष्मण शेरमाळे यांनी सरकारतर्फे विरार पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून, एका महिला आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65 (ब), (क), (ड), (फ), (ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.


