Mumbai Police News : गुन्हेगारांना झोप उडवणारी विशेष मोहीम! – मुंबई पोलिसांचा धडाकेबाज सर्जन

Mumbai Police Latest News : 10 दिवसांत 38 पाहिजे व फरार आरोपी गजाआड; 1989 पासूनचे गुन्हेगार अखेर सापडले
मुंबई | मुंबईतील गुन्हेगारांची Mumbai Criminal झोप उडवणाऱ्या विशेष मोहिमेची मुंबई पोलिसांनी Mumbai Police यशस्वी अमलबजावणी करत 38 पाहिजे आणि फरार आरोपींना अटक केली आहे. 11 जून ते 20 जून 2025 या अवघ्या 10 दिवसांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या या जोरदार मोहिमेने गुन्हेगारी जगताला हादरवून सोडले आहे. Mumbai Police Latest News
या मोहिमेमध्ये 1989, 1993 आणि 2007 मधील गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपीही पोलिसांच्या तावडीत सापडले. एकूण अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी 13 बॉडी ऑफेंडर्स, 9 प्रॉपर्टी ऑफेंडर्स आणि 12 इतर गुन्हेगार अशा प्रकारे वर्गवारी करण्यात आली आहे. याशिवाय 4 फरार आरोपींनाही या मोहिमेच्या अंतर्गत पकडण्यात आले.

परिमंडळ 4 च्या पोलिसांची शिस्तबद्ध मोहीम; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा यश

पोलीस उपायुक्त (DCP), परिमंडळ-4 यांच्या आदेशावरून सर्व पोलीस ठाण्यांमधून निवडलेल्या तज्ज्ञ पथकांनी कार्यरत होऊन एसओपीनुसार अत्यंत गुप्त आणि अचूक माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
या संपूर्ण कारवाईचं नेतृत्व पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, आणि पोलीस उप आयुक्त रागसुधा आर यांनी केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध आणि अचूक कामगिरी केली.
ही मोहीम म्हणजे पोलिसांची नियोजनशुद्धता, तांत्रिक कौशल्य आणि गुन्हेगारीविरोधातील प्रभावी नेतृत्वाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. नागरिकांत या यशस्वी कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत असून, मुंबई पोलीस पुन्हा एकदा “विश्वास आणि सुरक्षा” यांचा आदर्श ठरले आहेत.


