
Transporter strike : 1 जुलैपासून राज्यभर मालवाहतूक ‘चक्का जाम’; शालेय बस संघटनांचा 2 जुलैपासून संप
मुंबई | राज्य सरकारच्या ई-चलन प्रणालीमुळे वाढत्या दंडात्मक कारवायांविरोधात अखेर वाहनचालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे 1 जुलैपासून सर्व मालवाहतूक संघटनांनी चक्काजाम आंदोलनाचा नारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शालेय बस सेवा पुरवणाऱ्या संघटनांनीही 2 जुलैपासून अनिश्चित काळासाठी संप जाहीर केला आहे.
वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या अकारण दंडात्मक कारवाया, सीसीटीव्ही व वेबरेडरवर आधारित ई-चलन प्रणाली आणि शाळेच्या गेटवर कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून संतप्त झालेल्या संघटनांनी आंदोलनाची तयारी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, शासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे आणि ई-चालानच्या नावाखाली शोषण सुरू आहे.
मालवाहतूक व शालेय बसचालकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत
शाळा बस सेवा नियमांचे पालन करणाऱ्या वाहनांवर दंड लावू नये, चुकीच्या चलनांची रद्दीफ करण्यात यावी, अधिकाऱ्यांच्या मनमानी कारवायांवर नियंत्रण असावे आणि शासन, पोलीस, RTO, तसेच संघटनांचा समावेश असलेला संयुक्त टास्क फोर्स त्वरित स्थापन करण्यात यावा.
महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर ही लढाई अनिश्चित काळासाठी चालेल आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर थेट परिणाम होईल.”


