Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला: सभागृहात संतापाचा उद्रेक,अक्कलकोटमधील कार्यक्रमात काळं फासलं, धक्काबुक्की

Pravin Gaikwad Attacked: विधानसभेत वडेट्टीवारांचा आरोप – “ही हत्या करण्याचीच तयारी होती”
मुंबई | संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड Pravin Gaikwad Attacked यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेल्या हल्ल्याचे पडसाद थेट राज्याच्या विधिमंडळात उमटले आहेत. एका सार्वजनिक कार्यक्रमात गायकवाड यांच्यावर काळं फासण्यात आलं, डोक्यावर शाई ओतण्यात आली आणि त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित करत गायकवाड यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याचा थेट आरोप केला.
अक्कलकोट येथील एका सत्कार समारंभात प्रवीण गायकवाड यांना शिवधर्म फाउंडेशनच्या काही कार्यकर्त्यांनी लक्ष्य करत अचानक हल्ला चढवला. उपस्थितांचे लक्ष असताना त्यांच्यावर काळं फासण्यात आलं, कपडे फाडण्यात आले, आणि गाडीत बसण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ओढून काढून धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यातली दृश्यं संतापजनक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
विधानसभेत हा मुद्दा मांडताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, “केवळ त्यांच्या संस्थेचं नाव ‘संभाजी’ असल्याने त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यांना गाडीतून खेचून बाहेर पाडण्यात आलं, कॉलर पकडून फेकून दिलं गेलं. यानंतर त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला, हे पूर्णपणे पूर्वनियोजित होतं.” त्यांनी आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचंही सभागृहाला सांगितलं.
या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विधानसभेत सविस्तर माहिती दिली. “हल्लेखोरांनी ‘संभाजी’ नव्हे तर ‘छत्रपती संभाजी’ नाव ठेवायला हवं होतं, अशा कारणावरून वाद उकरून हा हल्ला केला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आरोपींना अटक केली असून, त्यांच्या विरोधात योग्य ती गुन्हेगारी कारवाई सुरू आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
ही घटना केवळ एका नेत्यावरचा हल्ला नसून, विचारस्वातंत्र्यावरची गुदरलेली आक्रमण आहे, अशी प्रतिक्रिया आता विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांकडून व्यक्त केली जात आहे.


