Bhaskar Jadhav : विरोधी पक्षासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

Shivsena Bhaskar Jadhav : विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्यासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शिवसेनेच्या आमदारांनी नेत्यांनी दिला
मुंबई :- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरला असून आजच्या दिवशीच अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने नैतिकता स्वीकारून धनंजय मुंडे Dhananjay Munde यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी मागील अनेक दिवसांपासून लावून धरली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन राज्यपालांकडे सुपूर्त केला आहे. तसेच, शिवसेना ठाकरे गटाकडून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याला विरोधी लवकरच विरोधी पक्षनेता मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव Shivsena Bhaskar Jadhav यांचे नाव निश्चित करण्यात आले असून तसा प्रस्ताव राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यावेळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, विरोधी पक्षनेते विधानपरिषद अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक आमदार उपस्थित होते. आज राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हजेरी लावली होती.
शिवसेना ठाकरे कडून विधानसभा अध्यक्ष यांना पत्राद्वारे भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अतिशय कमी जागा मिळाल्याने राज्याला विरोधी पक्ष नेता सुद्धा मिळणार नाही असे चर्चा असताना महाविकास आघाडी मधून ठाकरे गटाकडे आमदारांची संख्याबळ जास्त असून ते 20 आहे त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षाकरिता ठाकरे गटाकडून शिफारस करण्यात आली आहे. लवकरच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ठाकरे गटांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन राज्याला विरोधी पक्षनेता मिळेल? पाहावे लागेल