Pune Ilegal Spa Bulldozer Action | अवैध स्पा सेंटरवर पुणे पोलिसांचा बुलडोझर : पोलीस आयुक्त अमितेश कुमार

- कोरेगाव पार्क वपोनि सुनिल थोपटे यांची धाडसी कारवाई
पुणे, दि. 7 मार्चः महाराष्ट्र मिरर (मुबारक जिनेरी) Pune Ilegal Spa Bulldozer Action

पुणे शहरात फोफावलेल्या व आंबट शौकिनांचे लाड पुरविणाऱ्या अवैध स्पा सेंटरवर Pune Police पुणे पोलीसांकडून बुडडोझर फिरविण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार अवैध धंदे मोडून काढण्यासाठी शहरात व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. आज कोरेगाव पार्क येथील तब्बल 5 अवैध स्पा सेंटर वर बुलडोझर कारवाई करण्यात आली. कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर धाडसी कारवाई करण्यात आली. Pune Ilegal Spa Bulldozer action

पुणे शहरात स्पाच्या नावाखाली अवैध धंदे मोठे प्रमाणावर फोफावले होते. याची गांभीर्याने नोंद घेत पुणे पोलीसांनी त्याच्यावर कारवाईचा बुलडोझर चालवला आहे. यात महत्वाचे म्हणजे कोरेगाव पार्क सारख्या हाई प्रोफाईल भागात सदर अवैध स्पा चालकांनी उच्छाद मांडला होता. याची गांभीर्याने दखल घेत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांनी बुलडोझर कारवाई करत सदर अवैध धंदे जमीनदोस्त केले आहेत. यावेळी श्रीजा स्पा, निद्रा स्पा, टोमॅटो स्पा, नॅचरल स्पा आणि एलव्हिस स्पा या अवैध स्पा सेंटरवर कारवाई करण्यात आली. सदर स्पा प्रिया व पांडे, सुनिल शर्मा यांचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. Pune Ilegal Spa Bulldozer action
