Mumbai Fire News : मुंबईतील भायखळा येथील बहुमजली इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी

Mumbai Buyculla Fire News : मुंबईतील भायखळा परिसरात एका इमारतीला आग लागली. काही वेळातच इमारतीच्या वरच्या भागाला आगीने वेढले. अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.
मुंबई :- मुंबईतील भायखळा परिसरातील एका बहुमजली इमारतीला आग लागली आहे. Mumbai Latest Fire News काही वेळातच इमारतीच्या वरच्या भागाला आगीने वेढले. इमारतीला लागलेल्या आगीमुळे आभाळ पूर्णपणे धुरकट झाले आहे.सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही ही दिलासादायक बाब आहे.
बीएमसीच्या म्हणण्यानुसार, आज शुक्रवारी सकाळी भायखळा पूर्व, बी.ए. रस्त्यावरील न्यू ग्रेड इन्स्टा मिलजवळ असलेल्या सालसेट बिल्डिंग, इमारत क्रमांक 27 मध्ये ही आग लागली. सकाळी 10:45 वाजता या घटनेची नोंद झाली, त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने (MFB) लेव्हल-1 (मायनर) आगीची आणीबाणी घोषित केली.या इमारतीत 57 मजले असून 42व्या मजल्यावर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली असून ती वेगाने पसरत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाव्यतिरिक्त पोलीस, बेस्ट, बीएमसी वॉर्ड अधिकारी आणि रुग्णवाहिका आणि अन्य आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, 42 व्या मजल्यावर आग लागल्याने लोक स्वतः इमारतीतून बाहेर आले आहेत कारण आग कोणत्याही दिशेने जाऊ शकते. तुम्ही इमारत रिकामी करा आणि आग आटोक्यात आल्यावर तुम्ही परत जाऊ शकता, असेही अग्निशमन दलाचे म्हणणे आहे.