महाराष्ट्र

Jalna News : “तुझ्या मायच्या, बहिणीच्या नावावर पैसे…”; बबनराव लोणीकरांचे संतापजनक वक्तव्य, राजकीय वादाला तोंड

लोणीकर म्हणाले, “तुझ्या अंगावरचे कपडे, बूट आम्ही दिले… आमचंच घेऊन आमच्यावर टीका का?”

जालना | जालना जिल्ह्यातील एका गावातील कार्यक्रमात भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी गावातील काही टीकाकारांवर तावातावाने बोलताना हद पार केलेले दिसले. लोणीकर यांनी भाषणात अत्यंत आक्षेपार्ह आणि अवमानकारक शब्दांचा वापर करत, “तुझ्या मायचा पगार मी दिला”, “तुझ्या बहिणीच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले”, “तुझ्या अंगावरचे कपडे, चप्पल आम्हीच दिल्या”, अशा स्वरूपाचे वक्तव्य केले.

त्यांनी पुढे म्हणाले, “आमचंच सरकार आहे, आमच्याच योजनांमधून पैसे घेतो आणि त्याच आमच्यावर टीका करतोस? आमचं खाऊन आम्हालाच वाईट बोलतोस?” या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, “हे वक्तव्य केवळ घृणास्पदच नव्हे, तर महिलांचा आणि शेतकऱ्यांचा अवमान करणारे आहे. लोणीकरांनी तात्काळ माफी मागावी अथवा भाजपाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. अन्यथा आम्ही त्यांना कोणत्याही गावात फिरू देणार नाही.”

अंबादास दानवेंचा लोणीकरांवर कठोर शब्दात भावना व्यक्त केल्या

दरम्यान, लोणीकरांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेना (ठाकरे) आमदार अंबादास दानवे यांनी लोणीकरांच्या वक्तव्याचा व्हिडीओ एक्स या समाजमाध्यमावर शेअर करत लोणीकरांवरील नाराजी व्यक्त केली आहे. दानवे यांनी यासह एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव, कारण… तुमचे कपडे,बूट या जनतेमुळे आहेत. तुमची आमदारकी जनतेमुळे… तुमच्या कारमधील डिझेल जनतेमुळे… तुमचे विमानाचे तिकीटही जनतेमुळे.. तुमची नेतागिरी जनतेमुळे.. तुमचं विधानसभेतील स्थानही जनतेमुळेच आहे. निवडणूक येतेय. तुमचं वक्तव्य लक्षात ठेवू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0