Baramati ACB Trap News : बारामतीत एसीबीचा जबरदस्त सडेतोड सापळा – लाचखोर महिला पोलीस हवालदार 20 हजारांसह रंगेहात जाळ्यात!

बारामती | पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) झंझावाती कारवाईने संपूर्ण बारामती हादरली आहे. Pune Anti Corruption Bureau बारामती तालुका पोलीस ठाण्यातील Baramati Police Station महिला पोलीस हवालदार अंजना विभीषण नागरगोजे (वय 38) यांना 20 हजारांची लाच घेताना स्वतःच्या पोलीस ठाण्याच्या चार भिंतीतच रंगेहात पकडून एसीबीने थेट साखरगोड झटका दिला! Pune Latest Crime News
लाचखोरीचा धक्कादायक प्रकार
तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय यांच्यावर 498A, 504, 506 अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गेट जामीन मिळवून देण्यासाठी तपास अधिकारी नागरगोजे यांनी थेट एक लाख रुपयांची मागणी करून तक्रारदारास उघडपणे धमकावले. शेवटी तडजोडीअंती प्रत्येकी 5 हजार प्रमाणे एकूण 20 हजार वर सौदा पक्का झाला.
एसीबीचा वज्रप्रहार
तक्रार प्राप्त: 9 सप्टेंबर 2025
सापळा दिनांक: 10 सप्टेंबर 2025
ठिकाण: बारामती तालुका पोलीस स्टेशन
तक्रारदाराकडून पैशांची घसघशीत लाच स्वीकारताना नागरगोजे यांना पंचासमक्ष ACB ने थेट नोटांसह पकडले.
कायद्याच्या विळख्यात
लाचखोरीच्या या घृणास्पद कृत्यासाठी नागरगोजे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत हजर केले जाणार आहे.
कारवाईमागील कणखर पथक
ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले यांच्या कडक मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्वदा सावळे यांच्या शिस्तबद्ध पथकाने हा सडेतोड सापळा राबवला.
जनतेसाठी धडाकेबाज इशारा
कोणताही सरकारी नोकर कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी करत असल्यास त्वरित तक्रार करा!
📞 9823137154 (SP शिरीष सरदेशपांडे)
📞 9029030530 (अपर SP अजीत पाटील)
बारामतीत एसीबीच्या या विजेच्या झटक्याने भ्रष्टाचाराचे डोके उचलणाऱ्यांना कडक इशारा – लाच मागितली की थेट हातकडी हीच अंतिम फेड! Baramati Latest Crime News



