Tadipar Criminal Banned In Four States : चार जिल्ह्यातून आरोपीला दोन वर्षासाठी तडीपार
ठाणे :- मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई या चार जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार Tadipar News केलेल्या आरोपीला ठाण्याच्या वागळे इस्टेट बस डेपो येथून श्रीनगर पोलिसांनी Srinagar Police अटक केली आहे. संतोष उर्फ चांद किशोर मोर्या (27 वर्ष) हे आरोपीचे नाव असून, 18 जुन 2024 पासुन त्याला दोन वर्षांच्या कालावधी करिता हद्दपार करण्यात आले होते. Thane Police Latest News
वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या संतोष उर्फ चांद किशोर मोर्या याच्या विरुद्ध ठाणे आणि इतरत्र पोलीस ठाण्यात विविध प्रकरणामध्ये गुन्हे दाखल आहे.त्यामुळे ठाणे पोलिसांकडून संतोष याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर परिमंडळ-5 च्या पोलीस उप-आयुक्तांनी जुन-2024 मध्ये त्याला मुंबई, मुंबई उपनगर ठाणे आणि नवी मुंबई जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले होते. आरोपी संतोष यांने पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ -5, ठाणे यांची कोणतीही परवानगी न घेता शहरात प्रवेश केला होता. या संदर्भातील माहिती श्रीनगर पोलिसांना मिळाली असून पोलिसांनी सापळा रचून आरोपी संतोषला वागळे इस्टेट बस डेपो जवळून मध्यरात्री अटक केली आहे. त्याच्या विरोधात सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून श्रीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. संतोष याला अटक करून त्याच्या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार नयना बनसोडे या करीत आहे. Thane Police Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…