India Vs Netherlands T20 Match Update : सुपर-8 फेरीआधी टीम इंडियाची ‘बेंच स्ट्रेंथ’ आजमावणार; कुलदीप आणि अक्षरला विश्रांती, अर्शदीप-सुंदरला संधी
Ind vs Ned T-20 World Cup 2026 | टी-20 विश्वचषक 2026 च्या गट टप्प्यातील आपल्या शेवटच्या सामन्यात आज भारतीय संघ नेदरलँड्सविरुद्ध मैदानात उतरत आहे. सलग तीन सामने जिंकून आधीच सुपर-8 फेरी गाठलेल्या टीम इंडियासाठी हा सामना एका सराव सामन्याप्रमाणे असून, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघात महत्त्वाचे बदल
सुपर-8 च्या मोठ्या आव्हानांपूर्वी राखीव खेळाडूंना संधी देण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने संघात दोन मोठे बदल केले आहेत.
अर्शदीप सिंगचे पुनरागमन: फिरकीपटू कुलदीप यादवच्या जागी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे.
वॉशिंग्टन सुंदरला संधी: अष्टपैलू अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला अंतिम 11 मध्ये स्थान मिळाले आहे.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन खालीलप्रमाणे:
भारतीय संघ
इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
नेदरलँड्स संघ
मायकेल लेविट, मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/यष्टीरक्षक), झॅक लायन-कॅशेट, नोहा क्रोस, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, काइल क्लेन.
आधीच बाद फेरीत पोहोचल्यामुळे भारतीय खेळाडू आज मोकळेपणाने खेळतील, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. विशेषतः अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…