•पावसाने ऑस्ट्रेलियाचे नशीब नडले, झिम्बाब्वेची ऐतिहासिक झेप; टीम इंडियाच्या ग्रुपमधील सर्व संघ झाले निश्चित
T-20 World Cup Super-8 | टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा ऑस्ट्रेलियन संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला आहे. झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्धच्या अनपेक्षित पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचे भवितव्य पावसावर अवलंबून होते, मात्र निसर्गानेही साथ न दिल्याने कांगारूंचा प्रवास संपला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या बाहेर पडण्यामुळे सुपर-8 फेरीची गणिते पूर्णपणे बदलली असून, झिम्बाब्वेने थेट टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये (ग्रुप 1) स्थान मिळवले आहे.
पावसाने फिरवला खेळाचा नकाशा
मंगळवारी, 17 फेब्रुवारी रोजी झालेला झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड सामना पावसाने धुवून काढला. या एका गुणामुळे झिम्बाब्वेने सुपर-8 चे तिकीट पक्के केले. याआधी ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे झिम्बाब्वेच्या विजयाने किंवा सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलिया बाहेर जाणार हे निश्चित होते आणि तसेच घडले.
सुपर-8 मधील दोन गट असे असतील.
आतापर्यंत 7 संघांचे स्थान निश्चित झाले असून, आठव्या स्थानासाठी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात चुरस आहे.
ग्रुप 1 (Group 1): भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे.
ग्रुप 2 (Group 2): इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड आणि (पाकिस्तान किंवा अमेरिका).
सुपर-8 मध्ये टीम इंडियाचे मिशन: वेळापत्रक जाहीर
भारतीय संघ ग्रुप 1 मध्ये असल्याने त्यांचे आगामी तीन सामने अत्यंत महत्त्वाच्या स्टेडियमवर होणार आहेत. भारताचा प्रवास 22 फेब्रुवारीपासून सुरू होईल.
तारीख – सामना – ठिकाण – वेळ
22 फेब्रुवारी – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद – संध्या. 7.00 वा.
26 फेब्रुवारी – भारत विरुद्ध झिम्बाब्वे – एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई – संध्या. 7.00 वा.
01 मार्च – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – ईडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता संध्या.7.00 वा.
पाकिस्तानच्या भवितव्याचा आज फैसला
आज, 18 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध नामिबिया असा सामना होणार आहे. हा सामना जिंकल्यास पाकिस्तान सुपर-8 मध्ये प्रवेश करेल, अन्यथा अमेरिकेला संधी मिळण्याची शक्यता आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…