T-20 World Cup : सुपर-8 पूर्वी विराट कोहलीने कंबर कसली, नेटमध्ये घाम गाळला; ग्रुप स्टेजमध्ये तो फ्लॉप ठरला
Team India we in T-20 World Cup : विराट कोहली टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या ग्रुप स्टेजमध्ये पूर्णपणे फ्लॉप दिसला. कोहलीने तीन सामन्यात अनुक्रमे 01, 04 आणि 00 धावा केल्या होत्या.
ICC T-20 World Cup :- विराट कोहली सध्या चर्चेचा विषय बनला आहे. T20 वर्ल्ड कप 2024 च्या ग्रुप स्टेजमध्ये कोहलीची बॅटिंगमध्ये चमकदार किंवा दमदार कामगिरी केली नाही. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने खेळले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. कोहलीला (Virat Kohli) तिन्ही सामन्यांमध्ये दुहेरी आकडाही पार करता आला नाही. आता कोहलीने सुपर-8 साठी तयारी केली आहे. त्याला नेट प्रॅक्टिस मध्ये घाम फुटू लागला आहे. Team India Latest Update
बार्बाडोसमध्ये कोहलीने तासभर फलंदाजी केली. कोहली सुपर-8पूर्वी आपला फॉर्म परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. सुपर-8 मध्ये कोहलीची बॅट टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची असेल. वेस्ट इंडिजमध्ये सुपर-8 सामने खेळवले जाणार आहेत. Team India Latest Update
सुपर-8 मधील टीम इंडियाचे वेळापत्रक असे आहे
सुपर-8 मध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे, जो बार्बाडोस येथे खेळला जाईल. यानंतर टीम इंडिया 22 जून रोजी बांगलादेशविरुद्ध सुपर-8 मधील दुसरा सामना खेळणार आहे. हा सामना अँटिग्वा येथे होणार आहे. त्यानंतर सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना 24 जून रोजी सेंट लुसिया येथे ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.