Thane Crime News : नौपाडा परिसरात एकाच रात्री 14 घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखा कक्ष-1 पोलिसांकडून अटक

•ठाणे, मुंबई, नवी मुंबई, परिसरातील 09 गुन्हे उघडकीस, पोलिसांनी आरोपींना शिताफीने अटक केली आहे.
ठाणे :- नौपाडा परिसरात 12 मार्चच्या पहाटे एकाच वेळी 14 दुकानाचे शटर तोडून चोरी करणाऱ्या सराईत दोन चोरट्यांना गुन्हे शाखा कक्ष-1, ठाणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपींवर ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील 09 गुन्हे उघडकीस आणले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 2 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (4), 305 (3) प्रमाणे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्या होत्या.गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा, घटक-1, ठाणेकडून करण्यात येत असताना गुन्हयाचे समांतर तपासामध्ये गुन्हा घडला त्या ठिकाणाचे CCTV फुटेज प्राप्त करुन त्याच्या सहाय्याने गुन्हा केलेल्या व्यक्तीच्या वर्णनावरून त्यांचे ठाणे रेल्वेस्टेशन ते मिरारोड व उल्हासनगर या मार्गाक्रमणातील एकुन 90 ते 100 CCTV फुटेजची बारकाईने पडताळणी करण्यात आली. तसेच करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणा मध्ये आरोपी हे गुन्हा केल्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने घटनास्थळावरून निघुन गेल्याची माहिती प्राप्त करण्यात आली होती.आरोपी यांचे वर्णनावरून स्थानिक रिक्षा चालक, हॉटेल व्यवसायीक यांचे कडे अधिक तपास करून आरोपी यांना 20 मार्च रोजी अटक करण्यात आली असुन त्यांची प्रथम 24 मार्च व त्यानंतर 27 मार्च रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे. गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा, घटक-1पोलीस उपनिरीक्षक दिपक घुगे हे करीत आहेत.
दोन्ही आरोपी हे मूळचे नेपाळ देशातील असून ते वॉचमेन चे काम करत आहे.महंन्त भाने कामी, (वय-23) ,विष्णु रगुवा कामी, (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे.आरोपी यांचे कडे करण्यात आलेल्या कौशल्यपुर्वक तपासामध्ये त्यांनी ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात अशाच प्रकारचे एकुण 09 गुन्हे केल्याचे निष्पन्न करण्यात आले आहेत. तसेच आरोपींकडून पोलिसांनी तीन महागडे मोबाईल फोन आणि दहा हजार रुपये रोख असे एकूण दोन लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.इतर साथीदार लक्ष्मण सिंग, महेश देवकर, एकिंद्र सर्व राहणार मिरारोड ठाणे यांचेसह केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त, गुन्हे अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-1, गुन्हे शाखा, ठाणे शेखर बागडे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास सुर्यवंशी, पोलीस उप निरीक्षक दिपक घुगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव, दयानंद नाईक, सुनिल माने, पोलीस हवालदार संदीप महाडीक, प्रशांत निकुंभ, दिपक जाधव, नंदकुमार पाटील, शशिकांत सावंत, पोलीस शिपाई सागर सुरळकर यांनी केली आहे.