कळंब येथे स्वयमं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने महिला व बँक अधिकारी यांची कार्यशाळा उत्साहात संपन्न
कळंब दि.२९(प्रतिनिधी) कळंब येथे दि.२८ फेब्रुवारी रोजी स्वयमं शिक्षण प्रयोग संस्थेच्या अंतर्गत युरोपियन युनियन प्रोजेक्टच्या सहकार्याने कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरवातीस सावित्रीबाई फुले, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन करुन पुजन करण्यात आले. मिरा धोंगडे यांनी स्वागत गिताने मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजना कदम यांनी केले. त्यानंतर स्वयमं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने शासकिय अधिकारी, बॅक अधिकारी यांचा फुलांची,व फळांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी बी.बी.जाधव हे होते. या वेळी कृषी मंडळ अधिकारी एस.एस.आडसुळ, कृषी सहाय्यक अधिकारी डि.एस.आवाड, उमेश पोतदार, नंदुराजे कदम, श्रीमती भाग्यश्री गवळी यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली, कृषी संबंधित सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांना आवाहन केले. तर कळंब पंचायत समिती चे गट विकास अधिकारी आर.व्ही.चकोर, विस्तार अधिकारी मोहन बंडगर, निवास शिंदे यांनी पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती दिली. पंचायत समिती अंतर्गत मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांना आवाहन केले. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचे जिल्हा संसाधन व्यक्ती धनंजय पवार,आस्मा सोनवणे यांनी अन्न प्रक्रिया उद्योग कसे उभे करावेत,त्याचे प्रस्ताव कसे सादर करावेत, कागदपत्रे,अटी, शर्ती यांची सखोल माहिती दिली. जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावेत मंजूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु असे या वेळी सांगितले. तसेच एच,डी,एफ,सी, बँकेचे शाखाधिकारी संगमेश्वर डांगे, सहाय्यक व्यवस्थापक सदाशिव मदने यांनी बॅक कर्ज प्रकरणा विषयी माहिती दिली. महिलांकडुन जितके प्रस्ताव येतील तितके मंजुर करण्याचे आश्वासन दिले. सामाजिक कार्यकर्त्या महिला दक्षता समिती सदस्या सुप्रिया पौळ यांनी महिलांना आरोग्य विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.महिलांच्या तक्रारी आणी निवारण या विषयी माहिती दिली.ॲड दिनेश पौळ यांनी महिलांसाठी असणारे कायदे आणी कलम या विषयी माहिती दिली.
स्वयमं शिक्षण प्रयोग संस्थेचे प्रोजेक्ट् मॅनेजर किरन माने यांनी युरोपियन युनियन प्रोजेक्ट विषयी माहिती दिली.भाजीपाला मुल्य साखळी अंतर्गत मसाला व्यवसाय,आणी दुग्ध व्यवसाय, मुल्य साखळी अंतर्गत डेअरी व्यवसाय वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले.जिल्हा समन्वयक सिमा सय्यद यांनी सेंद्रिय शेती आणि शेतीपूरक व्यवसाया विषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जवळपास ३००महीलांनी उपस्थिती दर्शविली.
स्वयमं शिक्षण प्रयोग संस्थेचे तालुका समन्वयक रंजना कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर सुत्रसंचलन तालुका लिडर दिपाली जाधव यांनी केले.व आभार दिपा शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयमाला भातलवंडे,मिरा जाधव,टी.जे.तांबटकर यांनी परिश्रम घेतले.