Sushma Andhare : एक्साईजची व्यक्ती सभागृहात तंबाखू चोळतात सुषमा अंधारे
•राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर दावा ठोकणार
मुंबई :- पुणे आंदोलनात शंभूराज देसाईंचे नाव घेतल्याप्रकरणी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यासह आमदार रवींद्र धंगेकर यांना इशारा दिला होता. यावरूनच सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे.शंभूराज देसाई यांनी एक्ससाईज खातं संभाळलं असेल, तेव्हापासून नाशिक, संभाजीनगर किंवा पुणे परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये सातत्याने ड्रग्सचे साठे सापडत आहेत. यावर आम्ही एक्साईजच्या माणसाला काय बोलावं? असा सवाल करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना प्रत्युवर दिले आहे.
एक्साईजची व्यक्ती सभागृहात तंबाखू चोळतात सुषमा अंधारे म्हणाल्या,
“एक्ससाईज खात्याबद्दल तर न बोलले बरं, मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आहेत. त्यांचे 40 लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत. विशेषतः शंभूराज देसाई यांनी एक्ससाईज खातं संभाळलं असेल, तेव्हापासून नाशिक, संभाजीनगर किंवा पुणे परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये सातत्याने ड्रग्सचे साठे सापडत आहेत. यावर आम्ही एक्साईजच्या माणसाला काय बोलावं? ही एक्साईजची व्यक्ती सभागृहामध्ये तंबाखू चोळत बसतात”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
अशा दाव्यांना भीक घालणार नाही पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, “मला त्यांना एवढेच सांगायचं आहे की, आधी ठिकठिकाणी सापडलेले ड्रग्सचे साठे, ललित पाटील प्रकरणात झालेली नाचक्की आणि आता ज्या काही पद्धतीने पुण्यामध्ये चालू असलेले पब, बार आणि कुठले व्यवहार या सगळ्यांनी खात्याची अब्रू चव्हाट्यावर आलेली आहे, ती कशी सांभाळता येईल ते बघा तसेच असे दावे ठोकून किंवा दावे ठोकण्याची भाषा करून तुम्ही सुषमा अंधारेचा आवाज बंद करू शकाल असं तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा एकदा पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन सांगते, जात आणि धर्म या संकल्पनांच्या पलिकडे जाऊन, एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून आणि एक शिक्षिका म्हणून तुमच्या कुठल्याही दाव्यांना आणि केसेस, धमक्याना भीक न घालता माझी लढाई चालू ठेवणार आहे”, असेही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले आहे.