पुणे

Sushma Andhare : आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडू…. सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार

Chitra Wagh vs Sushma Andhare : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून ठाकरे यांच्या जाहिरातीतील आरोपावर ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांच्याकडून पलटवार

पुणे :- भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh )यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे व खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी जोरदार पलटवार केला आहे. आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. या बाई 3000 हून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवण्णा व मुलुंडच्या HD व्हिडिओ वाल्यावर अळीमिळी चुपचीळी करून बसल्या होत्या, असे त्या म्हणाल्यात. Lok Sabha Election News

पुण्यामध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना अंधारे म्हणाल्या, भाजपच्या अक्रस्ताळ्या महिला नेत्यांनी घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवला आहे. आणि आमच्या पक्षाच्या जाहिरातीत पॉर्न स्टार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. कोण पॉर्नस्टार आहे की नाही हे आम्हाला माहित नाही कारण आम्ही अशा प्रकारच्या फिल्म पाहत नाही. मात्र भाजपाच्या त्या महिला नेत्यांना यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल. त्यामुळे त्यांना या फिल्म मधल्या पात्रांचा परिचय आहे, असा टोला अंधारे यांनी लगावला. Lok Sabha Election News

चित्रा वाघ यांनी गुरुवारी सकाळी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर होत असल्याचा आरोप केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या ज्या जाहिराती येत आहेत. त्या ‘आदू बाळ नाईट लाईफ प्रोडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’च्या आहेत. या जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेले पात्र हे पॉर्नस्टार आहे. उद्धव ठाकरे या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाने पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0